
केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे कपाट बंद झाल्यानंतर आता 25 नोव्हेंबरला बद्रीनाथ धामचे कपाट बंद केले जाणार आहेत. यंदा चारधाम यात्रेत आतापर्यंत 50.62 लाख भाविकांनी दर्शन केले. चारधाममध्ये कडाक्याची थंडी पडल्याने भाविकांची संख्या कमी होत चालली आहे. पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी 2500 भाविकांनी बद्रीनाथ थामचे दर्शन केले. या ठिकाणचे तापमान 8 ते 10 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.
बांगलादेश भूकंपाने हादरले, 3 ठार व 200 जखमी
बांगलादेशमध्ये शुक्रवारी सकाळी 5.7 रिश्टर स्केलचा भूपंप झाला. या भूपंपात तीन जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत. भूपंपाचे पेंद्रबिंदू ढाक्यापासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या नरसिंगडी येथील माधाबादी येथे होते. भूपंपाचे धक्के इतके जोरदार होते की, दहा मजली इमारत बाजूला झुकली. बांगलादेशमध्ये सुरू असलेला बांगलादेश-आयर्लंड आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामनाही थांबवण्यात आला.
हिंदुस्थानच्या हद्दीत मासेमारी, 28 मच्छीमार ताब्यात
उत्तरी बंगालच्या खाडीत गस्ती घालत असताना हिंदुस्थानच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशच्या 28 मच्छीमारांना हिंदुस्थान तटरक्षक दलाने ताब्यात घेतले. हे 28 मच्छीमार बेकायदेशीररीत्या हिंदुस्थानच्या हद्दीत येऊन मासेमारी करत होते. तटरक्षक दलांनी तत्काळ कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. त्यांची बोटही जप्त करण्यात आली. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना मरीन पोलिसांकडे सोपवले आहे. पोलीस आता त्यांच्यावर मेरीटाइम जोन्स ऑफ इंडिया अॅक्ट अंतर्गत कारवाई करेल. मागील एका आठवडय़ात बांगलादेश नागरिकांना केलेली ही चौथी अटक आहे.
अमेरिकेत राहणाऱ्या 250 बेकायदेशीर लोकांना अटक
अमेरिकेतील उत्तरी पॅरोलिना येथे बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या 250 लोकांवर कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली. अमेरिकेत अवैधरीत्या राहणाऱ्या लोकांना शोधण्यासाठी अमेरिकेतील विविध भागांत मोहीम सुरू करण्यात आली आहे. लष्कर आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिकागोपासून लॉज एंजिलिसपर्यंत या शोध मोहिमेसाठी पाठवण्यात आले आहे. संपूर्ण देशभरात ही मोहीम राबविली जात असून आतापर्यंत हजारो लोकांना शोधून त्यांच्या देशात पाठवण्यात आले आहे. पोर्टलँड, ओरेगनसारख्या शहरांत ऑक्टोबरमध्ये 560 जणांना अटक करण्यात आली होती.
दिल्लीत 48 तासांत 700 सायबर चोरांना अटक
दिल्ली पोलिसांनी ऑपरेशन सायबर हॉक मोहीम राबवून 700 हून अधिक सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे. सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर चोरांना पकडण्यासाठी या मोहिमेत दिल्ली पोलिसांसोबत स्पेशल सेलची आयएफएसओ युनिट, गुन्हे शाखा, स्पेशल सेल, दिल्लीतील 15 जिह्यांतील पोलीस सहभागी झाले होते. पोलिसांचे हे ऑपरेशन जवळपास 48 तास चालले. पोलीस चौकशीत 1 हजार कोटी रुपयांच्या मनी ट्रेलचाही खुलासा झाला.


























































