शोविक चक्रवर्तीसह आठ जणांच्या जामिनाला एनसीबीचा आक्षेप; हायकोर्टात 30 मार्चला सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येशी संबंधित ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक व इतर 8 जणांना विशेष एनडीपीएस कोर्टाने जामीन मंजूर केला असून या जामिनाला एनसीबीने आक्षेप घेतला आहे.

याप्रकरणी एनसीबीने हायकोर्टात याचिका दाखल केली असून आरोपींचा जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर 30 मार्च रोजी न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर सुनावणी घेण्यात येणार आहे.

ड्रग्सप्रकरणी शोविकला 5 सप्टेंबर रोजी एनसीबीने अटक केली, तर रियाला 9 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. मुंबई हायकोर्टाने रियाचा 1 लाखांच्या बॉण्डवर जामीन मंजूर केला होता तर शोविक मात्र तुरुंगात शिक्षा भोगत होता. ड्रग्जच्या तस्करीत शोविकचा सहभाग असून ड्रग्ज पेडलर्स अनुज केशवानी आणि परिहार यांच्यासोबत तो सामील होता या आरोपामुळे शोविकचा जामीन अर्ज यापूर्वी न्यायालयाने फेटाळून लावला होता.