Photo – चंदेरी रंगाच्या पोशाखात श्रद्धा कपूरने वेधले चाहत्यांचे लक्ष, पाहा फोटो

आपल्या अनोख्या शैलीने कायम चाहत्यांने मन जिंकणारी आणि तिच्या फॅशन सेन्सने चाहत्यांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर. श्रद्धा सोशल मीडियावर कायम चर्चेत असून चाहत्यांना आपली अपडेट देत असते. नुकतेच श्रद्धाने इंस्टाग्रामवर चंदेरी पोशाख परिधान करुन फोटो शेअर केले आहेत. तिच्या हा अनोखा अंदाज चाहत्यांनाही आवडला असून चाहते कौतुक करत आहेत.

श्रद्धाच्या फोटोंमध्ये तिच्या सौंदर्याबरोबरच तिचा चंदेरी रंगाचा पोशाखही लक्षवेधक ठरला आहे.

या फोटोंमध्ये श्रद्धाने फिनेट क्रॉप टॉप घातला असून त्याच्यासोबत मेटॅलिक फ्लेअर पॅण्ट घातली आहे. त्यासोबत ऑफ शॉल्डर व्हाइट कलर कॉर्सेट स्टाइल केले आहे.

तिने जाळीदार फुल स्लीव्ह टॉप घातला आहे. सिक्विन स्टाइलमुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.

श्रद्धाच्या तिच्या या चंदेरी पोशाखासोबत चंदेरी रंगाची शोल्डर बॅग कॅरी केली होती. यासोबतच तिने गळ्यात चंकी नेकलेस घातला आहे.

हेअरस्टाईलबद्दल बोलायचे तर तिने तिच्या लहान केसांना सॉफ्ट कर्ल स्टाईल दिली आहे. तसेच हलका मेकअप आणि हाय हिल्ससह तिचा लूक पूर्ण केला आहे.