श्री जोतिबा मंदिरात आज-उद्या श्रावणषष्ठी यात्रा; पोलीस प्रशासन सज्ज

दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरात बुधवार (दि. 30) आणि गुरुवार (दि. 31) दोन दिवस श्रावणषष्ठाr यात्रा संपन्न होत आहे. यासाठी रात्रीपासून भाविक जोतिबा डोंगरावर दाखल होत आहेत. गुरुवारी सकाळी धुपारती सोहळ्याने यात्रेची सांगता होणार आहे. यासाठी लाखो भाविकांची गर्दी होणार असल्याने पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चैत्र शुद्ध षष्ठाr आणि श्रावण महिन्यातील श्रावण शुद्ध षष्ठाr अशा वर्षातून दोन षष्ठाr आहेत. या दिवशी श्री जोतिबा मंदिरामध्ये यात्रा भरणार आहे.

धार्मिक कार्यक्रम

– बुधवारी रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. सायंकाळी धुपारतीस प्रारंभ होऊन गुरुवारी सकाळी 6 वाजता मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल. धुपारती सोहळ्यावर गुलाल खोबऱ्यांची उधळण केल्यानंतर पुजाऱ्यांच्या घरी प्रसाद घेऊन भाविक परतीच्या मार्गावर लागतील.