श्री महाकालेश्वर – एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग

>> निळकंठ कुलकर्णी

अवतिकायां विहितावतारं मुक्तिप्रदानाय च सज्जनानाम् ।
अकालमृत्यो: परिरक्षणार्थ वन्दे महाकालमहासुरेशम् ।।

मध्यप्रदेशातील क्षिप्रा नदीच्या काठी उज्जैन येथे श्री महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. हे एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग असून स्वयंभू आहे तांत्रिक – मंत्रिकांसाठीही हे मंदिर खूप महत्त्वाचे मानले जाते. श्री महाकाल मंदिराची वर्णनं महाभारतातील वेदव्यासापासून कालिदास, बाणभट्ट आणि राजा भोज यांनीही केली आहे.

येथील मंदिराची निर्मिती अकराव्या शतकात झाली त्यानंतर जवळपास 140 वर्षांनंतर दिल्लीचा सुलतान इतुतमिशाने उज्जैन वर आक्रमण करून हे मंदिर उद्ध्वस्त केले. सध्याचे मंदिर मराठकालीन आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार अडीचशे वर्षांपूर्वी शिंदे घराण्याचे दिवाण बाबा रामचंद्र शेणवी यांनी केला होता.

कथा –

पुराणातील कथांमध्ये त्या नुसार उज्जयनीला राजा चंद्रसेन याचं राज्य होतं. ते भगवान शिवाचे परम भक्त होते आणि शिवगुणोमध्ये मुख्य मणिभद्र नामक गण राजा चंद्रसेन यांचे मित्र होते. एकदा राजा यांचे मित्र मणिभद्र यांनी राजा चंद्रसेन यांना चिंतामणी प्रदान केला. तो मणी खूप तेजोमय होता. राजा चंद्रसेन यांनी मणिला आपल्या गळ्यामध्ये धारण करून घेतला. पण मणी धारण करताना पूर्ण प्रभामंडल झगमगून उठलं आणि या सोबत दुसऱ्या देशामध्ये सुद्धा राजाची कीर्ती वाढायला लागली. राजा यांच्याप्रति आदर सन्मान आणि यश बघून अन्य राजांनी मणीला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण मणी राजाची अत्यंत प्रिय होता. त्यामुळे राजाने कोणालाही मणी दिला नाही.

राजाने मणी दिला नाही, म्हणून अन्य राजांनी आक्रमण करायला सुरुवात केलं. त्याच वेळी राजा चंद्रसेन भगवान महाकाल यांना शरण जाऊन ध्यानमग्न झाले. जेव्हा राजा चंद्रसेन बाबा महाकाल यांच्या समाधिस्थ स्थळी होते, तेव्हा त्यावेळी गोपी आपल्या छोट्या बालकाला सोबत घेऊन दर्शनाला आली. त्या बालकाचे वय पाच वर्षं होते आणि गोपी विधवा होती. राजा चंद्रसेनाला ध्यानमग्न बघून बालक सुद्धा शिवपूजा करायला प्रेरित झाला आणि त्याने कुठून तरी पाषाण घरी आणला आणि एकांत स्थळी बसून भक्तिभावाने शिवलिंगाची पूजा करू करायला लागला.

काही वेळानंतर तो बालक भक्ती मध्ये एवढा लीन झाला की त्याच्या आईने बोलवल्यावर सुद्धा गेला नाही. आईच्या पुन्हा पुन्हा बोलवण्यावर सुद्धा तो बालक गेला नाही. त्या क्रोधीत झालेल्या आईने त्या बालकाला मारायला सुरुवात केली आणि पूजेचे सर्व सामान काढून फेकून दिले. ध्यानातून मुक्त झाल्यानंतर त्याची पूजा नष्ट झाल्याचे पाहून बालकाला खूप दुःख झाले. अचानक त्याच दुःख पाहून एक चमत्कार झाला.

भगवान शिव यांची कृपा झाली आणि एक सुंदर मंदिराची निर्मिती झाली. मंदिराच्या मध्य भागी दिव्य शिवलिंग विराजमान होते आणि बालकाद्वारे केलेली पूजा तशीच होती. हे सर्व पाहून आई आश्चर्यचकित झाली. जेव्हा राजा चंद्रसेनाला या घटने बद्दलची माहिती मिळाली, तेव्हा राजा त्या शिवभक्त बालकाला भेटण्यास गेला. राजा चंद्रसेन सोबत अन्य इतर राजा सुद्धा तेथे गेले. सर्व राजांनी राजा चंद्रसेन यांच्या जवळ केलेल्या अपराधाबद्दल क्षमा मागितली आणि सर्वांनी मिळून महाकाल भगवान शिव यांची पूजा अर्चा करायला लागले.

तेव्हा रामभक्त श्री हनुमान समोर आले त्यांनी गोपी बालकाला बसवले आणि सर्व राजांना तसेच जनसमुदायाला संबोधित केले. या बालकाने शिवपूजेला बघून कोणत्याही मंत्रा विना आराधना करून शिवत्व, सर्वविध मंगल प्राप्त करून घेतले. शिव परम श्रेष्ठ बालक म्हणून त्याची किर्ती वाढली. त्याने तसेच हा बालक अखिल अनंत सुखाला प्राप्त करून मृत्युपश्चात मोक्षाला प्राप्त होईल.

या वंशाचा आठवा बालक पुरुष महायशस्वी नंद असेल, ज्याचे पुत्र स्वयं नारायण कृष्ण नावाने प्रतिष्ठित होतील. अस म्हटलं जातं तेव्हा पासून भगवान महाकाल उज्जयनीला स्वतः विराजमान झाले. तसेच महाकालला तेथील राजा मनाला जातं आणि राजाधिराज देवता सुद्धा म्हटलं जातं.

‘अय्यन्यास्मिज्जलधर महाकालमासाद्यकाले ,स्थातव्य ते नयन सुभंग यावदत्येती भानु:।
कुर्वन संध्या बलिभट हंता शुलि: श्लोघनीया, मामन्द्र।णा फलमविकलं लय्येसे गार्जीततानां ।। ‘

मंत्र –
दर्शन बिल्वपत्रस्य स्पर्शनं पापनाशनम् ।
अघोरपाप संहारं बिल्वपत्रं शिवापर्णम् ।।

([email protected])

आपली प्रतिक्रिया द्या