श्रेयस पोवारचे 8 धावांत 7 विकेट

मध्यमगती गोलंदाज श्रेयस पोवारच्या (8.1-3-8-7) अप्रतिम स्पेलच्या जोरावर नवरोज क्रिकेट क्लबने डॉ. एच. डी. कांगा लीग क्रिकेट स्पर्धेत ‘एफ’ डिव्हिजनमध्ये स्टार क्रिकेट क्लबविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर 73 धावांनी विजय मिळवला. आझाद मैदान येथील नवरोज सीसी मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रेयस पोवारने 7 विकेट घेत स्टार सीसीला 16.1 षटकात 32 धावांवर गुंडाळताना आपल्या कर्णधाराचा प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय योग्य ठरवला.

प्रत्युत्तरादाखल नवरोज सीसी संघाने 19.4 षटकांत 7 बाद 103 धावा करताना पहिल्या डावात आघाडी घेतली. तीच निर्णायक ठरली. त्यात प्रथमेश मसुरकर (43 धावा) आणि यश महाडिकची (32 धावा) खेळी महत्त्वपूर्ण ठरली. स्टार सीसीने दुसऱ्या डावात 18 षटकांत 3 बाद 57 धावांची मजल मारली. त्यात सुहृत कदमच्या सर्वाधिक 30 धावांचा समावेश आहे.