श्री क्षेत्र नृसिंहवाडीत लाखो भाविकांची घेतले दत्त दर्शन

511

श्री दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या तपसाधनेने पावन झालेल्या शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंह वाडीत बुधवारी दत्तजयंतीनिमित्त लाखो भाविक आलो होते. पहाटेपासूनच कडाक्याच्या थंडीतही दत्तभक्त पायी चालत दत्त दर्शनासाठी येत होते.

दत्तजयंती उत्सवानिमित्त पहाटे 4 वाजता काकड आरती व पूजा सकाळी 8 ते 12 वाजेदरम्यान करण्यात आली. पंचामृत अभिषेक दुपारी 12.30 वाजता करून श्रींच्या चरणकमलांची महापूजा झाली. यानंतर दुपारी पवमान पंचसूक्त पठण करण्यात आले. रात्री धूप-दीप आरती, पालखी सोहळा असे कार्यक्रम झाले. दुपारी 4 वाजता श्रींची उत्सव मूर्ती श्री नारायण स्वामी मंदिरातून वस्त्रालंकारांनी सजवून जन्मसोहळ्यासाठी मुख्य मंदिरात आणण्यात आली. यानंतर कीर्तनकार काणे बुवा यांचे कीर्तन होऊन 5 वाजता जन्मसोहळा साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी फुले गुलाल अबीर यांची उधळण करून दत्तनामाचा जयघोष केला. पारंपारिक आरत्या आणि पाळणा म्हणण्यात आला. सायंकाळी 5.30 नंतर श्रींचा पाळणा भाविकांच्या दर्शनासाठी दत्त जयंती उत्सवाचे मानकरी प्रशांत व उदय पुजारी यांचे घरी ठेवण्यात आला. दत्त देव संस्थानतर्फे दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचा 25 हजार भाविकांनी लाभ घेतला. दत्तजयंतीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन दर्शनाच्या पाच रांगा करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर क्लोज सर्किट टीव्ही सीसीटीव्ही याचींही व्यवस्था करण्यात आली होती. पोलिस व गृहरक्षक दलाने चोख बंदोबस्त ठेवला होता. दिवसभरात सुमारे दोन लाख भाविकांनी दत्त दर्शनाचा लाभ घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या