
तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानचे सहाय्यक उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांची राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. सदरच्या घटनेने खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.
नितीन शेटे हे शनेश्वर देवस्थानचे माजी विश्वस्त म्हणून सुद्धा काम पाहिले आहे. स्वतः सिव्हिल इंजिनिअर असल्याने देवस्थानने त्यांना प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली. गेल्या पाच वर्षापासून ते देवस्थानचे सहाय्यक उप कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. आज सकाळी त्यांनी शनिशिंगणापूरातील आपल्या राहत्या घरी छतास गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्या दीड महिन्यापासून शनिशिंगणापूर देवस्थानच्या बनावट ॲप घोटाळा व येथील गैरव्यवहार गाजत आहे . संशयाच्या भवऱ्यात येथील अधिकारी कर्मचारी असल्याची चर्चा होत असताना देवस्थानच्या आज एका अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याने शनी मंदिर परिसरासह अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून याबाबत पुढील तपास सुरू आहे.