हो मी दारू प्यायचे, अभिनेत्रीची कबुली

2587

अभिनेत्री श्रुती हसन हिने एका मुलाखतीत मी दारू प्यायचे अशी कबुली दिली होती. आता आपण दारूला स्पर्शही करत नाही असेही श्रुतीने म्हटले होते. त्यावर श्रुती खूप ट्रोल झाली होती. अनेकांनी तिला बेवडी म्हणून हिणवलेही होते. त्यावर आपण व्यसनाधीन नसल्याचे तिने म्हटले आहे.

एका मुलाखातीत श्रुती म्हणाली होती की मला व्हिस्की खूप आवडायची. परंतु दोन वर्षापूर्वी मी दारू सोडली आहे. त्यामुळे इंटरनेटवर ती चांगलीच ट्रोल झाली होती. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार श्रुती हसनने म्हटले की पूर्वी दारू प्यायचे. माझ्या या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. दारू पिणे ही आज काही मोठी गोष्ट राहिएलेली नाही. दारू पिणे ही लज्जास्पद बाब नाही. मला शांततेत जगायाचे आहे. दारू पिण्यावरून एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन होता कामा नये. आपण कधी दारू प्यायलो ही बाब सुध्दा काही लोक स्विकारत नाही. आपण २०१९ मध्ये आहोत आणि ही बाब हास्यास्पद आहे. जेव्हा मी म्हणते की मला शांततेत जगायचे आहे आणि दारू प्यायचे नाही तेव्हा त्यात एवढी चर्चा करण्यासारखे काय आहे असा सवालही तिने विचारला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या