दुसरं लग्न हे विषारी संसर्गासारखं, अभिनेत्रीने व्यक्त केला पश्चाताप

2623

कलाकारांच्या पडद्यावर दिसणारं जीवन आणि प्रत्यक्ष जीवन यामध्ये अनेकदा मोठी तफावत पाहायला मिळते. स्क्रीनवर लोकांसमोर हसतमुख राहणाऱ्या या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यात मात्र अनेक कटू अनुभवांना सामोरं जावं लागत असतं. असंच काहीसं अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्या बाबतीत घडलं आहे. श्वेताचे अभिनव कोहलीसोबतचे दुसरे लग्न देखील तुटण्याच्या तयारीत आहे. श्वेताने अभिनव विरोधात मारहाणीची तक्रार दाखल केल्यानंतर ती दोघं एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. त्यामुळे लवकरच त्यांचा घटस्फोट होईल असंही बोललं जातंय. श्वेताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनवसोबचं तिचं लग्न म्हणजे विषारी संसर्गच होता असं सांगितले आहे.


View this post on Instagram

On the sets of #MDKD with #nanhayatri

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari) on

‘आपला एक हात निकामी पडला तर आपण जगणं सोडून देणार का? नाही ना. आपण दुसऱ्या हाताचा अधिक वापर करू. तसंच आहे. माझ्या आयुष्यातील एका भागाला संसर्ग झाला होता. त्याचा मला खूप त्रास होत होता, लोक सांगत होते की तो अविभाज्य घटक आहे. पण मला माहीत होतं की तो विषारी आहे, त्यामुळे तो भाग दूर करण्यावाचून मला पर्याय नव्हता. म्हणून मी त्या भागाला माझ्या आयुष्यातून हद्दपार केलं. आता मी खूष आहे. लोकांना असं वाटतं की खूष असल्याचा दिखावा करतेय पण तसं नाही मी खरंच खूष आहे. एखादी गोष्ट चुकीची झाली तर माझं आयुष्य थांबणार नाही. मला माझ्या मुलांसाठी जगायचं आहे. माझी मुलं, त्यांची शाळा, औषधपाणी, माझं घर, फोन, इलेक्ट्रिसिटी बिल हे सर्वच मला बघायचं आहे’, असं श्वेताने या मुलाखतीत सांगितलं.

shweta-tiwari

श्वेता सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात कठिण प्रसंगातून जात असतानाच छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. ‘मेरे डॅड की दुल्हन’ या मालिकेतून श्वेता तिवारी पुन्हा छोट्या पडद्यावर छळकणार आहे. तसेच श्वेताची मुलगी पलक देखील लवकरच छोट्या पडद्यावर झळकणार असल्याचे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या