सियाचीनमध्ये हिमस्खलन, 18 हजार फुटांवर बर्फाखाली 8 जवान अडकले

599

जगातील सर्वात उंचावरील युद्धक्षेत्र म्हणून नावाजलेल्या सियाचीन येथे हिमस्खलन झाले आहे. यात पेट्रोलिंग करणारे हिंदुस्थानी लष्कराने 8 जवान बर्फामध्ये अडकले आहेत. सोमवारी दुपारी ही घटना घडली. जवानांना वाचवण्यासाठी लष्कराने ‘रेस्क्यू ऑपरेशन’ सुरू आहे.

लष्कराच्या सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, सियाचीनमध्ये 18 हजार फुटांवर पेट्रोलिंग करणारे आठ जवान हिमस्खलनामध्ये अडकले आहेत. बर्फामध्ये अडकलेल्या या जवानांच्या शोधासाठी लष्कराचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले असून शोधमोहीम सुरू आहे. अद्याप एकाही जवानाचा शोध लागलेला नाही.

उणे 60 अंश तापमान
सियाचीनमधील कारकोरम भाग जवळपास समुद्रसपाटीपासून 20 हजार फुटांवर असून येथील ग्लेशिअरची जगातील सर्वात उंच युद्धक्षेत्र म्हणून गणना होती. हिवाळ्यामध्ये येथील तामपान उणे 60 अंशापेक्षाही कमी होते. यादरम्यान अनेकदा हिमस्खलनाच्या घटना घडतात. याआधी येथे हिमस्खलनामध्ये अनेक जवानांना जीव गमवावा लागला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या