दप्तरावरचं चित्र जिवंत होऊन समोर आलं! ‘राधे’निमित्ताने सिद्धार्थने सांगितली बालपणीची आठवण

अभिनेता सिद्धार्थ जाधव याने मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. ‘सिंबा’ या चित्रपटातील दमदार परफॉर्मन्सनंतर आगामी काळात तो सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवाने केले आहे. यानिमित्ताने प्रभुदेवासोबतचा राधेच्या सेटवरील फोटो शेअर करत सिद्धार्थने बालपणीचा किस्सा सांगितला आहे.

सिद्धार्थ म्हणाला, ‘‘प्रभुदेवा… त्याचं ‘हम से है मुकाबला’मधलं चित्र असलेलं दप्तर घेऊन शाळेत जायचो. दप्तरावरचं चित्र जिवंत होऊन समोर येईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण या वेळेस दप्तरावरचं स्वप्न घेऊन जगणाऱया मला दप्तराच्या बाहेरच खूप काही शिकायला मिळालं. कलाकार म्हणून नेहमीच वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली काम करायची संधी मिळत असते आणि मी ती संधी सहसा सोडत नाही.’’ सिद्धार्थची ही पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या