या प्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीने तीन गाड्यांना ठोकले, पोलिसांनी केली अटक

26

सामना ऑनलाईन । मुंबई

चंदेरी दुनियेतील एका प्रसिद्ध अभिनेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा अभिनेता भरधाव गाडी चालवत असताना त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याच्या गाडीने तीन गाड्यांना ठोकले. या अपघातात तीनही गाड्यांचे चालक जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आहे. अटकेच्या काही वेळानंतरच सिद्धार्थची जामिनावर सुटका करण्यात आली.

siddharth-shukla-1

‘बालिका वधू’ या गाजलेल्या मालिकेतील अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या गाडीने शनिवारी संध्याकाळी ओशिवारा भागात तीन गाड्यांना ठोकले. सिद्धार्थ स्वत: गाडी चालवत होता. सिद्धार्थचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. सिद्धार्थची गाडी एवढी वेगात होती की तीन गाड्यांना ठोकल्यानंतर ती दोन फुट उंचीच्या डिव्हायडरवर चढली.

आपली प्रतिक्रिया द्या