सिक्कीममध्ये ढगफुटी; 6 जणांचा मृत्यू, 15 परदेशी पर्यटकांसह 1200 पर्यटक अडकले

सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यात ढगफुटीमुळे मोठे संकट ओढवले आहे. ढगफुटीमुळे अतिवृष्टी आणि पुरामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सिक्कीममध्ये बुधवारी 220.1 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे भूस्खलन झाल्याने 15 परदेशी नागरिकांसह 1200 नागरिक सिक्कीममध्ये अडकल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. हे पर्यटक लाचुंग गावात अडकले आहेत. पर्यटकांची सुटका करण्यासाठी हवाई मार्गाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करण्यात येत आहे. या मार्गावरील वाहतूक सुरू होण्यासाठी आठवड्याभराचा वेळ लागण्याची शक्यता आहे.

ढगफुटी, अतिवृष्टी आणि पुरामुळे भूस्खलन झाले आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. अडकलेल्या पर्यटकांना सोडवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात येत आहे. भूस्खलनामुळे महामार्गावर सात ते आठ ठिकाणी अडसर निर्माण झाले आहेत. त्यामुळे रस्ते मार्ग सुरू होण्यास आठवडाभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे अडकलेल्या पर्यटकांना सोडवण्यासाठी हवाई मार्गाची सोय उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे.

ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे काही नद्यांचा जलस्तर वाढला आहे. त्याबाबतचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिक्कीममध्ये आणि लाचुंग गावात अडकलेल्या पर्यटकांना खाद्यपदार्थ आणि औषधोपरचार पुरवण्यात येत आहेत.