
चांदीने आतापर्यंतचा सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. सराफा बाजारात शुक्रवारी चांदी प्रति किलो 2 हजार 366 रुपयांनी वाढून 1 लाख 10 हजार 300 रुपयांवर पोहोचली. चांदी पाठोपाठ सोन्याच्या किमतीत सुद्धा शुक्रवारी वाढ झाली. सोने साडेचारशे रुपयांनी वाढून प्रति तोळा 97 हजार 473 रुपयांवर पोहोचले. मुंबईत सोन्याची किंमत 24 पॅरेटसाठी 99 हजार रुपये तर 22 पॅरेटसाठी 90 हजार 750 रुपये झाली आहे. 1 जानेवारी 2025 पर्यंत सोन्याची किंमत 76 हजार रुपये तोळा होती. अवघ्या सहा महिन्यांत सोन्याच्या किमतीत 21 हजारांपर्यंत वाढ झाली आहे. वर्षभरापर्यंत सोने 1 लाख 30 हजारांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाजही वर्तवला आहे.