
चांदी पुन्हा चमकली असून चांदीचा भाव आता लाखाच्या पार गेला आहे. चांदीचा भाव प्रति किलो 1 किलो 1 लाख 2 हजार 100 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. चांदी वर्षभरात 1 लाख 30 हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. चांदीसोबत सोन्याच्या भावात सुद्धा सातत्याने वाढ होत आहे. 24 कॅरेट सोने 99,180 रुपये प्रति तोळा झाले आहे. तर 22 कॅरेट सोने 90 हजार 910 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. मागील महिन्यात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली होती.