सडपातळ दिसण्यासाठी रोज सकाळी घ्या ‘हे’ हेल्थ ड्रिंक

सडपातळ लोकांना कोणताही पेहराव उठून दिसतो. त्यामुळे सडपातळ दिसण्याची प्रत्येकाची इच्छा असते. तसेच लठ्ठपणामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत असल्याने वजन कमी करण्यासाठी सगळेजण प्रयत्न करतात. त्यामुळे शरीरात मेद साठवणाऱ्या पदार्थांचे सेवन टाळणे हिताचे आहे. तसेच दररोज व्यायामाचीही शरीराला गरज आहे. त्यासोबतच घरच्या घरी बनवता येणारे लिंबाचे हेल्थ ड्रिंक दररोज सकाळी उपाशी पोटी घेतल्यास सडपातळ होण्यास मदत होते.

घरच्या घरी हे हेल्थ ड्रिंक बनवण्यासाठी लिंबू, काळी मिरी, कोमट पाणी आणि मध हे पदार्थ लागतात. या सर्व मिश्रणांनी बनलेले ड्रिंक शरीरातील अतिरिक्त मेद कमी करून सडपातळ होण्यास मदत करते. एक ग्लास कोमट पाण्यात 1 लिंबू पिळावा. त्यात पाव चमचा काळी मिरी टाकावी. त्यानंतर त्यात एक चमचा मध टाकून ते मिश्रण ढवळून घ्यावे. मिश्रण एकजीव झाल्यावर ते हळूहळू घोट घोट करत प्यावे.

हे पेय दररोज सकाळी उपाशीपोटी घ्यावे. सकाळची सुरुवात या उत्साहवर्धक पेयाने झाल्यावर संपूर्ण दिवस उत्साहात जातो. काही जणांना काळ्या मिरीने त्रास होत असल्यास त्याचे प्रमाण कमी करून ती चिमूटभरही टाकता येते. अनेकजण सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी घेतात. मात्र, एखाद्यावेळी सकाळी वेळ मिळाला नाही, तर दिवसातून दोनवेळा लिंबूपाण्याचे सेवन केले तरी फायदा होतो. थंड किंवा साधे लिंबूपाणी उन्हाळ्यात घेता येते. मात्र, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात कोमट पाण्यासोबतच लिंबू पिळून त्याचे सेवन करावे. घरच्या घरी बनवलेले हेल्थ ड्रिंक घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आपली प्रतिक्रिया द्या