सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडले आणखी 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; रुग्णाची संख्या 16 वर

561

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी एकाच दिवसात 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. कणकवली तालुक्यातील डांबरे येथिल 4 रुग्ण, ढालकाठी येथे 2 , मालवण -हिवाळे येथे 1 तर वैभववाडी – नाधवडे येथे 1 रुग्ण आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या आता 16 वर पोचली आहे .

सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले आहेत त्यातील 5 रुग्ण बरे होऊन कोरोना मुक्त झाले आहेत. तर 3 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. आता नव्याने 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोनमध्ये करण्यात आला आहे. परंतु या जिल्ह्यात मुंबई – पुणे या रेड झोनमधील व्यक्तीचा शिरकाव होतच राहिला तर पुढील काळात धोका वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या