सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी 7 रुग्णांची कोरोनावर मात

310

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी 7 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्नांची संख्या 179 झाली आहे. जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित 243 असून सध्या सक्रिय 58 रुग्ण आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या एकूण बाधित रुग्णाची संख्या 243 झाली होती. यापैकी 172 रुग्णांनी यापूर्वीच कोरोनावर यशस्वी मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. तर आज नव्याने आणखी 7 रुग्णां नी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे एकूण बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 179 एवढी झाली आहे. तर सक्रिय संख्या 58 झाली आहे.

जिल्ह्यात कोरोना तपासणीसाठी घेण्यात आलेल्या अहवालांची संख्या 4 हजार 157 वर पोचली आहे. यातील 4 हजार 104 अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त अहवालातील 243 बाधित आले आहेत. तर 3 हजार 861 निगेटिव्ह आले आहेत. अजुन 53 अहवाल प्रलंबित आहेत. बाधित 243 पैकी 179 बरे होवून घरी परतले आहेत. पाच व्यक्ती मृत झाल्या आहेत. एक मुंबई येथे उपचाराला गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या 58 रुग्ण सक्रिय राहिले आहेत.

जिल्ह्यातील आयसोलेशन कक्षात सध्या 86 व्यक्ती उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड रुग्णालय असलेल्या जिल्हा रुग्णालयात सध्या 31 कोरोना बाधित तर 26 कोरोना संशयित उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर मध्ये 13 कोरोना बाधित आणि 2 कोरोना संशयित उपचार घेत आहेत. तर कोविड केअर सेंटरमध्ये 14 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. जिल्ह्याच्या आरोग्य पथकाने आज एक हजार 229 व्यक्तिची आरोग्य तपासणी केली. जिल्ह्यातील संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये दाखल 15 हजार 441 व्यक्ती आहेत. शासकीय संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये 31 संख्या आहे. गाव पातळीवरिल क्वारंटाइनमध्ये 12 हजार 915 व्यक्ती आहेत. नागरी क्षेत्रातील क्वारंटाइनमध्ये 2 हजार 495 व्यक्ति दाखल झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 114 कंटेन्मेंट झोन पैकी 30 कंटेन्मेंट झोन सक्रिय आहेत. यात देवगड 3, कणकवली 20, वैभववाडी 2, मालवण 3, कुडाळ 2 चा समावेश आहे.

मालवण तालुक्यातील आचरा- पिरावाडी येथे कंटेन्मेंट झोन
मालवण तालुक्यातील मौजे आचरा- पिरावाडीच्या 300 मीटर परिघामध्ये कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये 18 जुलै 202 रोजी रात्री 12 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1869)च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळचे उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर यांनी दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या