सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शासकीय बँकिंग व्यवहाराची मान्यता

369

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह अन्य 14 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच आयडीबीआय आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला शासकीय बँकिंग व्यवहार करायला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता शासकीय निधी जिल्हा बँकेत ठेवता येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.

यापूर्वी शासकीय कार्यालय सार्वजनिक उपक्रम आणि महामंडळाकडील बँकिंगविषयक व्यवहार किंवा राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत करण्याचे धोरण राज्य सरकारकडून घोषित करण्यात आले होते. त्यानुसार शासकीय बँकिंग व्यवहारास तसेच सार्वजनिक उपक्रम आणि महामंडळाकडील अतिरिक्त निधी गुंतविणे यासाठी केवळ राष्ट्रीयीकृत बँकांना मान्यता देण्यात आलेली होती. या अनुषंगाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सकारात्मक निर्णय
जिल्हा मध्यवर्ती बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार करण्यास मान्यता मिळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केलेला होता. मंत्रिमंडळामध्ये झालेल्या सकारात्मक निर्णयाबद्दल बँकेचे अध्यक्ष सतीश जगन्नाथ सावंत यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.

निर्णयाचे फायदे…
जिल्हा परिषदेसह अन्य शासकीय अन्य शासकीय यंत्रणेचे निधी जिल्हा बँकेमध्ये राहणार आहेत. शहरातील ग्राहकांबरोबरच खेड्यातील ग्राहकांनाही बँकिंग सेवा-सुविधा, पेन्शन सुविधाही नजीकच्या शाखेत उपलब्ध होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या