#Article370 माझे चुकले, माफ करा; पाकिस्तानात गायल्याप्रकरणी मिकाचा माफीनामा

1002

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मिका सिंग याने पाकिस्तानमध्ये जावून गाणे गायल्याप्रकरणी फेडरेशन आणि देशाची माफी मागितली आहे. जम्मू-कश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द झाले तेव्हा मिका सिंग पाकिस्तानात एका कार्यक्रमात गाणे गात होता. यानंतर त्याला ट्रोलही करण्यात आले होते. अखेर त्याने देशाची माफी मागितली आहे.

मला त्या ठिकाणी जावून गायचेच होते असे नाही. परंतु एकीकडे 370 कलम रद्द होणे आणि दुसरीकडे मी पाकिस्तानात गाणे म्हणणे, हा एक योगायोग होता. तरीही माझी चूकच झाली, मी देशाची आणि फेडरेशनची माफी मागतो, असे मिका सिंग म्हणाला. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

काय आहे प्रकरण ?
पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या नातेवाईकाच्या मेहंदी सोहळ्यात (8 ऑगस्ट) मिका सिंगने गाणे गायले होते. मिकाचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांचे कुटुंबही उपस्थित असल्याचे वृत्त देण्यात आले होते. पाकिस्तानमधील परफॉर्मन्समुळे अखिल भारतीय सिने कामगार संघटनेने (एआयसीडब्ल्यूए) मीका सिंगवर बंदी घातली होती. आता त्याने माफी मागितल्याने ही बंदी उठण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या