नेहा कक्कर-रोहनप्रित सिंगचा साखरपुडा उरकला, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांचा आज साखरपुडा झाला. साखरपुड्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात नेहा खूपच सुंदर दिसत असून चाहत्यांनी तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, नेहा आणि रोहनप्रित 26 ऑक्टोबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. त्याआधी 24 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये हे दोघे नोंदणी पद्धतीने विवाह करणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. यावेळी नेहा आणि रोहनचे कुटुंबीय, व काही जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित असणार आहे.

याआधी नेहा आणि रोहन यांच्या लग्नाच्या बातम्या फक्त साँग प्रमोशनचा एक स्टंट असल्याचा अंदाज वर्तवला गेला होता. मात्र दोघांची लग्नपत्रिकाही समोर आल्यानंतर ही चर्चा थांबली. लग्नपत्रिकेनुसार नेहा आणि रोहन यांचे लग्न 26 ऑक्टोबर 2020 रोजी सेटेलाइट टाऊन नावाने प्रसिद्ध जीरकपूर (जिल्हा – मोहाली, पंजाब) येथे होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या