बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहीत शेट्टी त्याच्या अॅक्शन सिनेमांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याचे सिनेमे पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. अशातच आता त्याचा ‘सिंघम अगेन’ हा सिनेमा येत असून दिवाळीत हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून तो चर्चेत आला आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहून नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
सिंघमच्या तिसऱ्या भागात अजय देवगण, करिना कपूरसोबत दीपिका पादुकोण, रणवीर सिंह , अर्जुन कपूर आणि अक्षय कुमार दिसतील. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये हे सर्व कलाकार केमियोमध्ये दिसत आहेत. तर संपूर्ण कथाच या ट्रेलरमध्ये खुली केली आहे, त्यामुळे ट्रेलर धमाकेदार दिसत असूनही ट्रोल केले जात आहे.
‘सिंघम अगेन’ च्या ट्रेलरला संपूर्ण सिनेमा दाखवल्याचे बोलले जात आहे. युट्युबवर ट्रेलरच्या कमेण्टमध्ये एका युजरने लिहीले की, संपूर्ण सिनेमा अपलोड करण्यासाठी धन्यवाद. एकाने लिहीलेय, असे वाटतेय कोणीतरी चुकीने ट्रेलरच्या जागी सिनेमा अपलोड केला आहे. तर दुसऱ्याने सांगितले की, रोहित शेट्टी थेट जनतेच्या धैर्याला आव्हान करत आहेत.
एकाने म्हटलेय बाकीची लोकं सिनेमाआधी ट्रेलर लॉन्च करतात रोहित शेट्टी मात्र ट्रेलरआधी सिनेमा रिलीज करतो. तर एकाने लिहीले संदीप रेड्डी वांगा 3:24:59 तास संपूर्ण सिनेमा दाखवू शकले नाहीत मात्र रोहित शेट्टी फक्त 4 मिनीटात. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत.
‘सिंघम अगेन’ दिवाळीच्या मुहूर्तावर 1 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे च्रेलरमध्येच सिनेमा संपतो की आणखी काही मनोरंजक पाहायला मिळणार हे त्याच दिवशी कळेल.