सिंहगड डेंटल कॉलेजच्या विभाग प्रमुखाने संपवले जीवन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंहगड डेंटल कॉलेजमधील विभाग प्रमुख असलेल्या एका 45 कर्षीय डॉक्टर प्राध्यापकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. कामाच्या अतिताणामुळे ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.

 राजू पाटील (45) असे या प्राध्यापकाचे नाक आहे. ते सिंहगड डेंटल कॉलेजमध्ये विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. शुक्रकारी दुपारी पाटील यांच्या पत्नी घरी आल्याकर त्यांना पती गळफास घेतलेल्या अकस्थेत आढळले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किनय पाटणकर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाक घेऊन पंचनामा केला. घटनेचा तपास करत असताना पोलिसांना घटनास्थळी एक ‘सुसाईड नोट’ सापडली आहे. कामाच्या काढत्या ताणामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले असल्याची माहिती
पोलिसांनी दिली. आत्महत्येमागे केकळ कामाचा ताण हेच एकमेक कारण आहे की आणखी काही याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सिंहगड रोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.