देशभरात सोमवारी रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा झाला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने राख्या आणि भेटवस्तूंची मोठी खरेदी झाली. या वर्षी राख्यांच्या विक्रीने तर नवा रेकॉर्ड केला. रविवारपर्यंत तर 12000 कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाली. या वर्षी चायनीज राख्यांना मागणी नव्हती. लोकांनी स्वदेशी राख्या खरेदी करण्यावर भर दिला. यंदा रक्षाबंधनाच्या निमित्ताने लोकांनी स्वदेशी राख्यांना अधिकतर पसंती दिल्याचे पाहायला मिळाले. गेल्या वर्षी 10 हजार कोटी रुपयांचा राख्यांचा व्यवहार झाला होता. यंदा त्यामध्ये खूप वाढ झाली. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने राख्यांच्या उलाढालीचे आकडे जाहीर केलेत. त्यानुसार देशभरात रक्षाबंधनाला 12 हजार कोटींपेक्षा अधिक उलाढाल झाली. रविवारी रात्री उशिरापर्यंत राख्या आणि भेटवस्तू खरेदी करणाऱ्यांची गर्दी होती. सोमवारीही बाजारात खरेदीचा उत्साह होता.
ऑनलाइन खरेदीला जोर
ब्लिंकिट या क्विक कॉमर्स कंपनीचे संस्थापक अलबिंदर धिंडसा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लिंकिट या प्लॅटफॉर्मवर यंदा रेकॉर्डब्रेक राख्या विकल्या गेल्या. प्रत्येक मिनिटाला राख्यांची खरेदी झाली. त्यामुळे राख्यांची रेकॉर्डब्रेक विक्री झाली. राख्यांव्यतिरिक्त चॉकलेट्स, अन्य वस्तूंचीही जोरदार विक्री झाली.
यावर्षी लोकांनी चायनीज राख्यांना दूर ठेवले. स्वदेशी राख्यांना जास्त मागणी दिसून आली. त्यामुळे यंदा राखी पौर्णिमेला मार्केटमध्ये मोठी उलाढाल झाली, असे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने सांगितले. गेल्या वर्षी 10 हजार कोटी, 2022 मध्ये सात हजार कोटी, 2021 मध्ये सहा हजार, 2020 मध्ये पाच हजार कोटी रुपयांचा व्यवहार झाला होता.