सीताराम कुंटे होणार राज्याचे मुख्य सचिव

राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. 28 फेब्रुवारी रोजी विद्यमान सचिव संजय कुमार निवृत्त होत असून त्यांच्या जागी कुंटे यांचे नाव जवळजवळ निश्चित मानले जात आहे.

सीताराम कुंटे आणि प्रवीणसिंह परदेशी सध्या मुख्य सचिवपदाचे दावेदार आहेत. सध्या गृह विभागासारखी महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे सीताराम कुंटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कुंटे यांचा प्रशासकीय सेवेतील 36 वर्षांचा अनुभव आहे. 30 नोव्हेंबर रोजी ते सेवानिवृत्त होतील. 9 महिन्यांचा काळ कुंटे यांना लाभणार आहे. कुंटे हे 1993 मध्ये धुळे जिल्हाधिकारी होते. त्यानंतर त्यांनी म्हाडा, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वन व पर्यावरण आदी विभाग सांभाळले. ते मुंबई महापालिकेचे आयंक्त होते.

 संजय कुमारांच्या मार्गात भाजपचा खोडा

विद्यमान मुख्य सचिव संजय कुमार हे मुदतवाढ न घेतलेले ते अलीकडच्या काळातील एकमेव मुख्य सचिव ठरले आहेत. संजय कुमार हे महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचे (एमईआरसी) अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. मात्र भाजपने मात्र एमईआरसीच्या अध्यक्षपदी संजय कुमार यांची नियुक्ती करण्यास आतापासूनच विरोध सुरू केला आहे. संजय कुमार यांना नेमण्यासाठी घाईगडबडीत प्रक्रिया राबविली असल्याचे सांगत भाजपने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या