पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवशी आढळले सहा कोरोना पॉझिटीव्ह

1360

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा धोका वाढला आहे. शनिवारी एकाच दिवशी सहाजण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्या नऊवर गेली आहे. चार व्हायसीएमधील आणि दोन जण खासगी रुग्णालयात दाखल होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर मागील तीन दिवसांपासून पुन्हा शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. दिल्लीच्या निजामुद्दीन भागातील तबलिगी जमात मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांतून आलेल्या दोघांना गुरुवारी आणि त्यांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील एकाला शुक्रवारी अशा तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांनतर आज पुन्हा एकाचदिवशी सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यामध्ये दिल्लीच्या निजामुद्दीन भागातील तबलिगी मरकझमधील धार्मिक कार्यक्रमांतून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या  23 नागरिकांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आलेल्या चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय डॉ. डी. व्हाय. पाटील रुग्णालयात दाखल असलेला एक आणि पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल असलेला पण पिंपरी-चिंचवडचा रहिवासी असलेला अशा दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील एकजण अमेरिकेतून प्रवास करून आला आहे. आज एकाच दिवशी सहा रुग्ण आढळल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्या नऊवर गेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या