नंदुरबार : गणपती विसर्जनादरम्यान सहा तरुणांचा बुडून मृत्यू

915

नंदूरबार जिल्ह्यात गणपती विसर्जनादरम्यान सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला. कैलास चित्रकथे, सचिन चित्रकथे, रविंद्र चित्रकथे, विशाल चित्रकथे, दीपक चित्रकथे आणि सागर चित्रकथे अशी मृतांची नावे आहेत. शहादा तालुक्यातील वडछील गावात ही घटना घडली. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पाचव्या दिवशी गणपती विसर्जन करण्यासाठी हे तरुण कमरावद येथील तलावामध्ये उतरले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. त्यांच्यासोबत आलेल्या तरुणांना पोहता येत नसल्यांनी त्यांनी आरडाओरडा सुरू केला. आवाज ऐकल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत तरुणांना वाचवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत सर्वांचा मृत्यू झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या