
मध्य प्रदेशातील धार जिह्यात बदनावर-उज्जैन पह्रलेन हायवेवर रविवारी एका भीषण अपघातात सहा मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. एका भरधाव आणि अनियंत्रित ट्रकने समोरून येणाऱया व्हॅनला जोरदार धडक दिल्याने व्हॅनचा अक्षरशः चक्काचूर झाला. दुपारी एकच्या सुमारास पंचकवासा गावाजवळ हा अपघात झाला. अपघातात तरुण गंभीर जखमी झाला आहे.
उज्जैन येथे भगवान महाकालचं दर्शन घेऊन हे तरुण परतत होते. जखमी तरुणाला उपचारासाठी बदनावर येथील नागरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व तरुण गुजरातच्या वडोदरा येथील रहिवासी होते.




























































