सहा जिल्हा परिषदांमधील 85 जागांसाठी पुन्हा निवडणूक

स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितींमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त नको, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने सहा जिल्हा परिषदांमधील 85 जागा आणि विविध पंचायत समित्यांमधील 116 जागा रिक्त केल्या आहेत. या जागांवर पुन्हा निवडणूक होणार आहे.

पालघर जि. प. मधील मातब्बरांचे सभासदत्व रद्द

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फटका पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश सांबरे, कृषी सभापती सुशील चुरी, महिला व बालकल्याण सभापती अनुष्का ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नरेश आकरे या मातब्बरांना बसला आहे. 15 ओबीसी जागांवरील सदस्यत्व रद्द झाले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि जिजाऊ संघटना 7, भाजप 4, शिवसेना 3 आणि माकपच्या एका सदस्याचा समावेश आहे.

सहा जि. प.मध्ये फेरनिवडणूक होणाऱया जागा
नागपूर – 16
पालघर – 15
धुळे – 15
अकोला – 14
वाशिम – 14
नंदुरबार – 11

आपली प्रतिक्रिया द्या