धुळय़ात भीषण अपघात,एसटी-कंटेनरच्या धडकेत 12 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहादा-दोंडाईचा राज्य मार्गावरील निमगूळ गावाजवळ रविवारी रात्री भीषण अपघात झाला. एसटी-कंटेनरच्या धडकेत 12 जण जागीच ठार झाले तर 12 जण गंभीर जखमी झाले आहे. एसटीतील आणखी 26 प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत. परिवहन महामंडळाच्या बसला कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात घडला. जखमी आणि मृत नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिह्यांतील आहेत.

निमगूळ गावाजवळ रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. दोंडाईचा येथून महामंडळाची बस शहाद्याकडे निघाली. त्यावेळी दोंडाईचापासून जवळ असलेल्या निमगूळ गावाजवळ बसला कंटेनरने धडक दिली.

परिवहन महामंडळातर्फे मृतांच्या वारसांना दहा लाख रुपयांची मदत करण्यात येईल. याशिवाय मृतांच्या वारसांना तातडीची मदत म्हणून 10 हजार रुपये, तर जखमींना एक हजार रुपयांची मदत दिली आहे, असे मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. मृत प्रवाशांच्या वारसांना मंत्री रावल यांनी प्रत्येकी वैयक्तिक दहा हजार रुपयांची मदत केली.

मृत्युमुखी प्रवाशांची नावे- शकील बागवान, प्रेरणा वंजारी, इद्रिस मन्यार, मुकेश नागीन, हस्तक वाकचौरे, वृषाली भावसार, मनीषा बागल, सौरभ वंजारी, सोमनाथ पाटील, सुयोग जैन, तेजस भावसार, संजय अलकारी.

गंभीर जखमी-  मितला पावरा, साकेत पिंजारी, मुमताज इराणी, हेमंत देशपांडे, सागर वाघमोडे, रईस पिंजारी, हारून शेख, जाकीर पिंजारी, रुकसार मन्यार, जगदीश भावसार, सुनीता भावसार, रुक्सारबी नमियार.