हिंदुस्थानातील आर्थिक मंदी तात्पुरती; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मत

448

हिंदुस्थानातील आर्थिक मंदी तात्पुत्या स्वरुपाची आहे. आगामी काळात यात सुधारणा होईल. सध्या हिंदुस्थानी बाजारात घसरण होत असून अर्थव्यवस्था थंडावली आहे. ही घसरण थांबून हिंदुस्थान आर्थिक प्रगती करेल. हिंदुस्थानची अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान होईल, असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अध्यक्षा क्रिस्टलिना जॉर्जिवा यांनी व्यक्त केले आहे. जागतिक आर्थिक मंचाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केले.

हिंदुस्थानातील आर्थिक मंदी तात्पुरत्या स्वरुपाची आहे, असे मत जॉर्जिवा यांनी व्यक्त केले आहे. हिंदुस्थानात आर्थिक मंदीमुळे अर्थव्यवस्थेची गती धीमी झाली आहे. देशाच्या जीडीपीमध्ये सातत्याने घसरण होत आहे. अर्थव्यवस्थेवर असलेले मंदीचे सावट आणि जीडीपी घसरल्यामुळे हे संकंट कधी दूर होणार याची चर्चा तज्ज्ञामध्ये होत आहे. मात्र, आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केलेल्या मतामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. मात्र, आता दोन्ही देशांत झालेल्या करारामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरील संकट दूर होणार आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा 3.3 टक्के आहे. हा दर सकारात्मक नाही, असेही त्यांनी सांगितले.

2019-20 या आर्थिक वर्षांत हिंदुस्थानचा जीडीपी 4.8 टक्के राहील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे. या विकासदरामध्ये 2020-21 या वर्षात वाढ होत तो 5.8 वर पोहचेल तर 2021-22 मध्ये तो 6.5 टक्के राहील, असेही नाणेनिधीने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या