कडक! अवघ्या 5 मिनिटात 5 लाख स्मार्टफोनची झाली विक्री, जाणून घ्या वैशिष्ट्य

स्मार्टफोन निर्माता कंपनी रेडमीच्या एका फोनची सध्या मार्केटमध्ये हवा पाहायला मिळत आहे. लोकांमध्ये या फोनची एवढी क्रेझ निर्माण झाली आहे की लाखो स्मार्टफोन हातोपाथ विकले जात आहेत. चीनमध्ये नुकताच लॉन्च झालेल्या Redme k40 या फोनला तुफान प्रतिसाद मिळाला असून अवघ्या पाच मिनिटांमध्ये पाच लाख स्मार्टफोनची विक्री झाली आहे. पुढील सेल 8 मार्च असल्याची माहितीही कंपनीने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली आहे. तसेच हिंदुस्थानमध्ये हा फोन Mi 11X आणि Mi11X या नावाने लॉन्च होणार आहे.

Redme k40 या सीरिजमध्ये Redmi K40, Redmi K40 Pro आणि Redmi K40 Pro+ हे मॉडेल्स आहेत. हा फोन कंपनीने चीनमध्ये 25 फेब्रुवारीला लॉन्च केला होता. लॉन्च होताच लोक यावर तुटून पडली आणि स्मार्टफोनची लाखो यूनिट्स पाच मिनिटात विकली गेली.

redmi-k40-pro

वैशिष्ट्य

– 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस ई4 अल्मोल्ड डिस्प्ले
– 1080×2400 pixels रिझोल्यूशन
– 8 जीबी रॅमे पासून ते 12 जीबी रॅमपर्यंत पर्याय, तसेच 256 जीबी स्टोरेज
– 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth v5.1, GPS/ A-GPS, NFC, Infrared (IR) आणि एक USB Type-C पोर्ट
– 4520 एमएएचची बॅटरी

redmi-k40-camera

कॅमेरा

Redme k40 या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड आणि 5 मेगापिक्सलची मायक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा यात आहे.

redmi-k40

दरम्यान, Redme k40 pro मध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड आणि 5 मेगापिक्सलची मायक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तर Redme k40 pro प्लसमध्ये 108 मेगापिक्सल कॅमेरा देम्यात आला आहे. बाकी सर्व फीचर्स Redme k40 pro सारखेच आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या