मुंबईचे ‘हिवाळी’ अधिवेशन लांबणीवर; शहर-उपनगर धुरक्याच्या दुलईत

27

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईत सकाळी हवेत जाणवणारा गारवा आणि दिसणारे धुरकट वातावरण यामुळे धुकेच पसरले आहे की काय? असा संभ्रम निर्माण होतोय. मात्र हे धुके नसून धूलिकण आणि धूरमिश्रित धुरके आहे असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. पहाटे वातावरणात गारवा जाणवत असला तरी ती थंडी नाही. मुंबईत थंडीचे आगमन डिसेंबरच्या मध्यानंतरच होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईचे ‘हिवाळी’ अधिवेशन लांबणार असल्याचे दिसतेय.

दिवाळीतील फटाक्यांमुळे सध्या हवेची गुणवत्ता घसरली आहे. त्यातच वातावरणातील धूलिकण आणि धूर, आर्दतेचे वाढलेले प्रमाण यामुळे मुंबई धुरक्यात हरवली आहे. वांद्रे, अंधेरी, वरळी, प्रभादेवी, कुलाबा या भागांमध्ये पहाटे आणि सायंकाळच्या वेळी धुरक्याची जणू चादरच पसरली आहे. धुरक्यामुळे नाकातून पाणी येणे, डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे या लक्षणांनी मुंबईकर हैराण झाले आहेत.

मुंबईत दिसणारी ही स्थिती दरवर्षी नोव्हेंबरमध्ये अनुभवता येते. हे धुके नसून धुरके (हेज) आहे. मुंबईतील धूलिकण आणि सुक्ष्म कणांमुळे वातावरणाची दृष्यमानता कमी होते. याचा परिणाम विमानांच्या उड्डाणावर देखील होतो.
– कृष्णानंद होसाळीकर उपमहासंचालक, हवामान विभाग

summary- smog spread in mumbai delayed winter season

आपली प्रतिक्रिया द्या