
शिवसेनेने दहिसरमध्ये 2 ऑगस्ट रोजी वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, साडी वाटप आदी सामाजिक उपक्रम आयोजित केले आहेत. शिवसेना शाखा क्र. 1 आणि संस्कार प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित उपक्रमात सकाळी वृक्षारोपण तर सायंकाळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार दहिसर पूर्वेकडील विद्यामंदिर शाळा सभागृहात सायंकाळी 6 वाजता होईल.
सी. पी. गोयंका शाळा, आय. सी. काॅलनी येथे महिलांना साडी वाटप करण्यात येईल. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका उपविभागप्रमुख तेजस्वी घोसाळकर यांनी केले आहे. उपनेते विनोद घोसाळकर, माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभाग संघटक सुजाता शिंगाडे आदी यावेळी उपस्थित राहतील.