जालनामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; कोरोनाबाधितांची संख्या 54 वर

703

जालना जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 54 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत नसल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शनिवारी जालना शहरातील मुख्य बाजारपेठेत रमजानच्या सणासाठी आणि इतर खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मुख्य बाजारपेठेत वाढणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढत आहे.

जिल्ह्यात 21 मे पासून लॉकडाऊनमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी शिथिलता दिली आहे. मात्र, लॉकडाऊन शिथील करताच नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. जालना शहरातील मामाचौक व मुख्य बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. या गर्दीतून पायी जाणेही कठीण होत आहे. यात नागरिकांसोबतच दुकानदारही सोशल डिस्टन्सिंगला पाळत नसल्याचे दिसून येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या