सामाजिक सलोख्यासाठी मशीदीत सुसंवाद कार्यक्रम; समर्थ पोलिसांचा उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी आणि सर्वधर्म समभावनेतेच्या जनजागृतीसाठी मशीदीमध्ये सर्वधर्मीयांचा सुसंवाद कार्यक्रम घेण्यात आला आहे. वेगवेगळ्या समाजातील घटकांना बोलावून सामाजिक दायित्त्वाचे मार्गदर्शन करण्यात आले. शहरात अशाप्रकारचा पहिलाद संवाद मशीदीत झाल्यामुळे या कार्यक्रमाचे कौतुक होत आहे. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवार पेठेतील मोती मशीदीत सुसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

मोती मस्जिद जमात ट्रस्ट पुणे, ऑल इंडिया पयाम – ए – इन्सानियत फोरम यांनी गैर-धर्मिक, गैर-राजकीय संदेश देण्यासाठी प्राधान्य दिले आहे. त्यानुसार समाजाप्रती आमच्या जबाबदार्‍या या विषयावर मौलाना बिलाल अब्दुल हई नदवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सभासद गणेश बिडकर, पोलीस उपायुक्त संदीप गिल मौलाना याह्या साहब कासमी ( राहता, नगर ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, सप्तऋषी गुरुजी( नागेश्वर मंदिर सोमवार पेठ) डॉ. पी. ए. इनामदार, फादर फिटर डिक्रुझ, भोला सिंग अरोरा, मौलाना रेझिंग अश्रफ न दवी, सलीम पटेकरी उपस्थित होते.

समाजामध्ये जातीय सलोखा कसा व्यवस्थित राहील, बंधू- प्रेम टिकून राहण्यासाठी उपस्थितांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाला समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळे, मज्जित ट्रस्टी गैर मुस्लिम समाज इतर सामाजिक संघटना असे 150 ते 200 जनसमुदाय उपस्थित होता. दरम्यान, सामाजिक जबाबदारी आणि भूमिका पार पाडण्यासाठी प्रत्येकाने सर्वधर्मसमभावाचे आचारण केले पाहिजे. त्यामुळे जातीभेद कमी होण्यास मदत होणार असल्याचे मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी व्यक्त केले.