
पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी कराचीच्या ल्यारी भागात गाढवांची शर्यत आयोजित करण्यात आली होती. ही परंपरा प्राचीन लोकसंस्कृतीचा एक भाग आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही म्हणाल, ‘‘पाकिस्तानमध्ये काहीही शक्य आहे!’’ Times of Karachi या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये गाढवे दुचाकी गाड्या ओढत रस्त्यांवरून धावताना दिसत आहेत. शर्यत जिंकल्यानंतर एका माणसाने आनंदाने आपल्या गाढवाला मिठी मारली. गाढवानेही आपले मोठे दात दाखवले, जणू काही ते हसत आहे. हे दृश्य फार हास्यास्पद वाटत आहे. एका युझरने कमेंट केली की, गाढवांनी गाढवांची रेस जिंकली, व्वा! तर अन्य एकाने “कुत्र्यांची शर्यत कधी होणार? , असा प्रश्न विचारल्यावर मजेशीर उत्तरे देण्यात आली. “पाकिस्तानची प्रगती पाहून खूप आनंद झाला, अशी उपरोधिक कमेंटही एकाने केली आहे.
























































