ट्रेंड- पाहिजे तेवढ्या नोटा घरी न्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या एक पंपनी आणि तिचा बॉस खूप चर्चेत आहे. कारण, हा बॉस बोनस देण्याच्या अनोख्या पद्धतीसाठी ओळखला जातो. तो कर्मचाऱयांना रोख रक्कम बोनस म्हणून देतो. जितके घेऊ शकता तितके घ्या असे कर्मचाऱयाना सांगतो.  हेनान कुआंगशान व्रेन पंपनी लिमिटेड असे या कंपनीने नाव आहे. नुकताच या चिनी कंपनीने 270 मिलियन युआनच्या नफ्यातून 180 मिलियन युआन (26 मिलियन अमेरिकी डॉलर)चा बोनस वाटला. या वेळी सुमारे 7000 लोकांसाठी 800 जेवणाचे टेबल्स लावण्यात आले होते. नंतर नोटांचे बंडलच्या बंडल टेबलवर ठेवले गेले. या संपूर्ण कार्यक्रमाचे ऑनलाइन प्रसारण केले गेले. सोशल मीडियावर पंपनीच्या बोनस वितरण कार्यक्रमाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.