कसे असतील चवीला? सोशल मीडियावर मॅगीच्या लाडूंचा धुमाकूळ

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये काही भयंकर फूड कॉम्बिनेशन सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. गुलाबजाम पाव, कुरकुरे मिल्कशेक, गोड मॅगी, चॉकलेट ड्रायफ्रुट डोसा असे भयंकर कॉम्बिनेशन समोर आले. हे व्हिडीओ बघून नेटकरी देखील वैतागले होते. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारचे विचित्र कॉम्बिनेशने नेटकऱ्यांची झोप उडवली आहे.


साधारणत: मॅगी हा घराघरात आवडणारा पदार्थ. गेल्या वर्षी या मॅगीचे स्वीट व्हर्जन जेव्हा व्हायरल झाले तेव्हा नेटकरी भडकले होते. आमच्या आवडत्या मॅगीसोबत कोणतेही प्रयोग केलेले चालणार नाहीत असा इशाराच अनेक नेटकऱ्यांनी दिला होता. मात्र आता पुन्हा एकदा मॅगीसोबतचा एक प्रयोग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ते म्हणजे मॅगीचे लाडू…


शुगर कप या ट्विटर हँडलवरून मॅगीच्या लाडवांचा फोटो शेअर करण्यात आला आहे. मॅगीचे न्यूडल्स गुळात मिक्स करून त्यावर ड्रायफ्रुटचे ड्रेसिंग करण्यात आले आहे. हे लाडू बघून नेटकऱ्यांचा पारा पुन्हा एकदा चढला आहे. कुणी असे भलते सलते प्रयोग करणं थांबविण्यास सांगितले आहे तर कुणी त्यावरून मिम्स तयार केले आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या