भरधाव जीपची कारला धडक, पोलीस उपनिरीक्षक ठार

भरधाव महिंद्र मॅक्स जीपने मारुती सुझुकी गाडीला दिलेल्या धडकेत नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक गणेश भीमराव जरांडे (वय 32, मूळ रा. कळस, ता. इंदापूर, जि. पुणे) यांचा मृत्यू झाल्याची घटना पंढरपूर-दिघंची रस्त्यावरील सांगोला तालुक्यातील कटफळ येथे घडली आहे. तर, जरांडे यांच्या पत्नीसह पाचजण जखमी झाले आहेत.

सोनाली गणेश जरांडे (कय 25), समर्थ गणेश जरांडे (वय 3, रा. कळस, ता. इंदापूर), नानासाहेब सखाराम गाढवे (42), अर्चना नानासाहेब गाढके (32), संग्राम नानासाहेब गाढवे (18) अशी जखमींची नावे आहेत.

गणेश जरांडे हे नवी मुंबई येथे पोलीस मुख्यालयात नोकरीला होते. महिंद्रा मॅक्स या वाहनचालकाविरोधात बेजबाबदारपणे गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पत्नी, बहीण, मेव्हणे, लहान मुले अकलूज येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. सीताराम उत्तम खरात (रा. शेरेवाडी, ता. सांगोला) यांनी पिकअप चालकाकिरुद्ध तक्रार दाखल केली असून, सांगोला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रताप कसगडे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या