स्थायी समिती गठीत झाल्यावरच बजेट, आयुक्त पी. शिवशंकर यांची माहिती

सोलापूर महापालिकेचे सन 2021-22 करिताचे अंदाजपत्रक स्थायी समिती गठीत झाल्यानंतरच पाठविण्यात येईल, असे महापािलका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले आहे.

महापालिका प्रशासनाचे अंदाजपत्रक तयार झाले आहे. मात्र, त्यात गत काही दिवसांपासून काही सुधारणा करण्यात येत आहेत. वास्तविक 15 फेब्रुवारीच्या आत प्रशासनाकडून अंदाजपत्रक सादर होणे अपेक्षित असते; पण यंदा त्यास विलंब होत आहे. महापालिका आयुक्तांनी प्रशासनाचे अंदाजपत्रक सादर होईल, असे सांगितले हेते. मात्र, सुधारणा पूर्ण न झाल्याने पुन्हा अंदाजपत्रक लांबणीवर पडले आहे.

या पार्श्वभूमीवर सध्या स्थायी समिती गठीत न झाल्याने प्रशासनाचे अंदाजपत्रक थेट सर्वसाधारण सभेकडे पाठविण्याचे सुतोवाच आयुक्तांनी केले होते. मात्र, स्थायी सभापतिपदाचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाल्याने 5 मार्चला स्थायी समिती गठीत होण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणण्यात आली आहे. यामुळे आता अंदाजपत्रक सभापतिपदाच्या निवडीनंतरच पाठविण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. गत तीन वर्षे सभापतिपदामुळे स्थायी समिती अस्तित्वात नव्हती. आता तीन दिवसांत ती गठित होणार असल्याने प्रशासनाचे अंदाजपत्रक प्रोटोकॉलनुसार स्थायीकडे सादर होणार आहे.

…तर मिळकतकरात मिळणार सवलत

n शहराला विविध स्त्र्ााsतांमधून तीन दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाण्याचा वापर शहरवासीयांना काटकसरीने करावा लागतो. या पार्श्वभूमीवर वर्षाजल पुनर्भरण करण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. पावसाचे पाणी वाया जाऊ नये म्हणून प्रत्येक मिळकतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सोय झाल्यास भावी काळात शहराला पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही. त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका प्रशासन मिळकतकरात सवलत देण्याचा विचार करीत आहे. वर्षाजल बोअरमध्ये सोडून त्याचा पुनर्वापर करणाऱया तसेच घरांवर सोलर सिस्टीम बसवून पारंपरिक विजेची बचत करणाऱया मिळकतदारांना करात सवलत देण्याची योजना प्रस्तावित आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या