सोलापूर जिल्हा परिषदेच्या 152 शाळांना मिळणार मुख्याध्यापक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार 795 शाळांपैकी 152 शाळांवर मुख्याध्यापकच नाहीत. त्या शाळांना कायमस्वरूपी मुख्याध्यापक मिळणार आहेत. मे अखेरीस दोन विस्ताराधिकारी सेवानिवृत्त होणार असल्याने आता 15 मे रोजी सहाजणांना विस्ताराधिकारीपदी पदोन्नती मिळणार आहे. त्यानंतर केंद्रप्रमुखांची पदोन्नती होणार आहे.

सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांना विस्ताराधिकारी होण्याची संधी मिळणार आहे. पदकी 50 टक्के आणि बीएडलादेखील 50 टक्के गुण आवश्यक आहेत. अशा पात्र शिक्षकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून, त्याची पडताळणी सुरू आहे. सोमवारी, दि. 15 मे रोजी पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तत्पूर्वी, प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा शिक्षक संघटनेने दिला आहे. त्याची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्कामी यांनी घेत पदोन्नतीचे वेळापत्रक निश्चित केले आहे. दरम्यान, नकार कळविलेल्या समाजशास्त्र्ा विषयाच्या 210 शिक्षकांना आता उपशिक्षकपदी नेमणूक दिली जाणार आहे. त्यादृष्टीने प्राथमिक शिक्षणाधिकाऱयांनी नियोजन केले आहे.

शाळा सुरू होण्यापूर्वी पदोन्नतीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जाणार आहे. तसेच संचमान्येनंतर शिक्षकांची रिक्तपदेदेखील भरली जाणार आहेत. 15 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांना समान व पुरेशा प्रमाणात शिक्षक मिळतील, अशापद्धतीने भरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे.

केंद्रप्रमुखांची 119 पदे रिक्त

केंद्रप्रमुख पदासाठी सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षक, मुख्याध्यापक पात्र ठरतात. पण, तो शिक्षक बीए, बीएड, प्रशिक्षित पदकीधर असणे आकश्यक आहे. दरम्यान, जिह्यात सध्या 199 केंद्रप्रमुखांची पदे रिक्त असून, त्यातील 99 पदे सरळ सेकेतून भरली जाणार आहेत. तर 100 पदे पदोन्नतीने भरली जाणार आहेत. मुख्याध्यापक, किस्ताराधिकाऱयांची प्रक्रिया पूर्ण झाल्याकर केंद्रप्रमुखांची पदे पदोन्नतीनेच भरणार आहेत.

सहा किस्ताराधिकाऱयांची पदे पदोन्नतीने भरणार

जिल्हा परिषद शाळांकरील सहा किस्ताराधिकाऱयांची पदे आता पदोन्नतीने भरली जाणार आहेत. सेकाज्येष्ठतेनुसार संबंधितांचे प्रस्ताक मागकिण्यात आले आहेत. त्याची काटेकोर पडताळणी करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकाऱयांना दिले आहेत. 15 मे रोजी पदोन्नतीची कार्यकाही करण्याचे प्रस्ताकित असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितली.