सोलापुरात टोल नाक्यावर हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली आहे. टोल कर्मचाऱ्याला चिरडले असून चालक फरार झाला आहे. या अपघातात टोल कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सोलापूरच्या मोहोळ ते पंढरपूर पालखी मार्गावरील पेनूर टोलनाक्याव एक मालवाहतूक करणारा ट्रक भरधाव वेगाने आला. टोल नाक्यावर थांबवण्याऐवजी चालकाने ट्रक त्याच स्पीडने ट्रक चालवला. यात टोल कर्मचारी हनुमंत माने गाडीखाली आले आणि चिरडले गेले. तरी ट्रकचालकाने गाडी थांबवली नाही. माने यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चालकाचा शोध सुरू केला आहे.
महाराष्ट्र के सोलापुर में ट्रक ने टोल कर्मचारी को कुचल दिया। कर्मचारी की मौके पर ही मौत। #RoadSafety #SaferRoads #DriveSafe pic.twitter.com/RsovW0Zvek
— Jitender Sharma (@capt_ivane) October 9, 2024