
दहा जणांच्या मृत्यूसाठी कारणीभूत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात यश आले आहे. शार्पशूटरने कामगिरी केली असून नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
करमाळा तालुक्यात धुमाकूळ नरभक्षक बिबटय़ाने 8 डिसेंबर रोजी सकाळी चिकलठाणा येथील ऊसतोड मजुराच्या आठवर्षीय मुलीवर हल्ला केला होता. यात तिचा मृत्यू झाला ओता. या बिबटय़ाने आतापर्यंत सोलापूर, नगर, बीड जिल्ह्यातील दहाहून अधिकजणांना मारले आहे. आतापर्यंत करमाळ्यात या बिबटय़ाने तिघांना ठार मारले असून, अनेक पशूंनाही लक्ष्य केल्याने वातावरण भीतीदायक होते. आता शार्पशूटरने या बिबट्याला ठार केल्याने या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.























































