
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ पंढरपूर येथील पालवी संस्थेच्या संस्थापिका मंगल शहा यांना जाहीर झाल्याची घोषणा कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. यात सोलापूर ही जन्मभूमी, कर्मभूमी क ऋणानुबंध असणाऱ्या महनीय व्यक्तीस ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मान केला जातो. यंदाच्या या ‘जीवनगौरव पुरस्कारा’चे मानकरी मंगलताई शहा या ठरल्या आहेत. सामाजिक क्षेत्रात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. पालवी संस्थेच्या माध्यमातून एचआयक्ही एड्सग्रस्त अनाथ बालकांचे संगोपन क त्यांना शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मंगल शहा यांच्याकडून होत आहे. रोख 51 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरकपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्करूप आहे.
शुक्रवारी, दि. 1 ऑगस्ट 2025 रोजी विद्यापीठाचा 21वा वर्धापन दिन समारंभ साजरा होणार आहे. सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम कुलगुरू प्रा. महानकर यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर किद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार कितरण सोहळा पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेसाठी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव डॉ. अतुल लकडे, वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे, परीक्षा संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, सहायक कुलसचिव सोमनाथ सोनकांबळे, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे, डॉ. अंबादास भासके आदी उपस्थित होते.
यांना जाहीर झाले पुरस्कार
उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कारः व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स सोलापूर. उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कारः प्राचार्य डॉ. विजय अनंत आठवले (वालचंद इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर). उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (महाविद्यालय)- डॉ. भाग्येश बळकंत देशमुख (कालचंद इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर). उत्कृष्ट शिक्षकेतर अधिकारी पुरस्कारः राजीव उत्तम खपाले. उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वर्ग तीनः डॉ. शिरीष शामराक बंडगर. उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वर्ग चारः नवनाथ नागनाथ ताटे. उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार (महाविद्यालय)- राजेंद्र शंकर गिड्डे. उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार (चतुर्थश्रेणी कर्मचारी महाविद्यालय)- दत्ता निकृत्ती भोसले आणि डॉ. रेकप्पा सिद्धाप्पा कोळी.