एनटीपीसी आता सौरऊर्जा निर्मिती करणार! महाराष्ट्रात पाचशे मेगावॅटचे प्रकल्प उभारणार

336

देशासाठी औष्णिक वीजनिर्मिती करणारे नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन (एनटीपीसी) आता महाराष्ट्रात सौर ऊर्जा निर्मिती करणार आहे. सौर ऊर्जा निर्मितीचा दर आता अडीच रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्याची दखल घेऊन आता एनटीपीसीनेही सौर ऊर्जा निर्मितीकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यनुसार तब्बल पाचशे मेगावॅटचे प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

औष्णिक प्रकल्पातून वीजनिर्मिती करताना कोळसा जाळावा लागत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. तसेच येथे तयार होणार्‍या विजेचे दरही साडेतीन रुपयांच्या घरात आहेत. त्याचबरोबर जलविद्युत ऊर्जा स्वस्त असली तरी अपुर्‍या पाण्यामुळे त्यावर मर्यादा येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरातील अपारंपरिक ऊर्जानिर्मिती क्षमता पावणेदोन लाख मेगावॅटपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सौरऊर्जेची क्षमता वाढणार

राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वीजवाहिनीअंतर्गत महावितरण, महानिर्मितीसह अन्य खासगी कंपन्यांच्या माध्यमातून 2025 पर्यंत सुमारे  साडेसात हजार मेगावॅटचे छोटे सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यानंतर आता एनटीपीसीही पाचशे मेगावॅटचे प्रकल्प उभारणार आसल्याने राज्याची सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता वाढणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या