जवानांनी सर्जिकल स्ट्राइकसाठी बिबट्याचे मलमूत्र वापरले

सामना ऑनलाईन । पुणे

पाकिस्तानव्याप्त कश्मीरमध्ये 2016 मध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकसाठी हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांनी बिबट्याचे मलमूत्र वापरले होते, असा गौप्यस्फोट लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी केला. हिंदुस्थानी जवानांनी 3.30 वाजता घुसून तीन दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून 29 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे राजेंद्र निंभोरकर यांना थोरले बाजीराव पेशवे शौर्य हा पुरस्कार शिवसेना नेते माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी निंभोरकर बोलत होते. सर्जिकल स्ट्राइकची रणनीती आखताना रस्त्यात पाकिस्तानव्याप्त कश्मीरमधील गावांमधून जाताना कुत्रे भुंकण्याची आणि हल्ले करण्याची शक्यता होती. त्यामुळे आम्ही बिबट्याचे मलमूत्र सोबत नेले, कुत्री बिबट्याला घाबरत असल्याने याचा वापर आम्ही दहशतवाद्यांचे तळ असलेल्या गावांच्या बाहेर केला असे त्यांनी सांगितले.