काही गुलाबी moments

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मधुचंद्र... आपल्या आवडत्या व्यक्तीसोबतचे खूप खास क्षण… उर्मिला आणि आदिनाथ कोठारे…

मधुचंद्र म्हणजे...रोमॅण्टिक आऊटिंग. कुठेतरी परदेशात असं रोमॅण्टिक ठिकाणी एकांतात जाणे.

प्लॅनिंग कसे केले?...खरं तर आमच्या दोघांच्या आवडी-निवडी सारख्या आहेत. आम्ही हनिमुनला वाईल्ड लाईफ आफ्रिका सफारीला गेलो होतो. तांझानिया जंगलाच्या मधोमध एका फाईव्ह स्टार हॉटेलात आम्ही राहिलो होतो. आमच्या खिडकीच्या बाहेर जिराफ वगैरे प्राणी दिसत होते.

आवडते ठिकाण?…खूप आहेत. मला नेहमी फिरायला जायला आवडतं. मला पुणे खूप आवडतं. सतत तिथे जायची वाट पाहत असतो. तिथे जाण्यासाठी मी नेहमी उत्साही असतो, पुण्यात आमचं घर आहे.

मधुचंद्रासाठी शॉपिंग…शॉपिंग…? अजिबात नाही. आमचे कुठलेही प्लॅन हे अगदी शेवटच्या क्षणाला ठरतात. हनिमुनला जाण्याचा प्लॅनही तसाच ठरला. त्यामुळे अशावेळी शॉपिंगला वगैरे आम्हाला वेळ नसतो.

काही खास क्षण… जेव्हा आम्ही हनिमूनला गेलो तेव्हा मी उर्मिलाला सरप्राईज दिले होते. त्या आफ्रिकेच्या जंगलात सकाळी लवकर निघालो आणि आमची हॉट एअर बलूनमध्ये राईड होती. तो हॉट एअर बलून जंगलाच्या मधोमध जाऊन मोठय़ाशा पठारावर थांबला. तिथे झाडाखाली आमच्यासाठी ब्रेकफास्ट होता. तिथे शॅम्पेन वगैरे होते. हे सरप्राईज पाहून उर्मिलाचा फुललेला चेहरा तो क्षण माझ्यासाठी खास होता.

मधुचंद्र हवाच की… ? मधुचंद्र हवा. पण तुम्ही कुठे जाता यापेक्षा तुम्ही खास व्यक्तीसोबत आहात हे महत्वाचे असते. तुम्ही गावी गेलात तरी चालतं. त्यासाठी एकांतपणा महत्वाचा असतो. दोघांनी एकमेकांसोबत क्षण घालवणे महत्वाचे असते. जिथे तुम्ही दोघं एकमेकांसोबत एकाग्रतेने राहू शकता असे कुठेही शांतपणे वेळ घालवू शकता असे ठिकाण.

एकमेकांशी नव्याने ओळख...खूपच नव्याने ओळख होती. लग्नाआधी आम्ही एकमेकांना डेट करत होतो. पण लग्नानंतर एकत्र एकमेकांसोबत असतो. आम्हाला आमच्या अनेक गोष्टी सवयी कळू लागल्या. एकमेकांना जास्त ओळखत गेलो. आता चांगले ओळखतो.

किती दिवस द्यावेत...बजेट आणि वेळ या दोन गोष्टींवर आपले राहण्याचा काळ ठरतो. आपण कुठे जातोय, किती खर्च होणार आहे आणि आपल्याला सुट्टी किती दिवस आहे त्यावर प्रत्येकाचा सुट्टीचा कालावधी ठरतो. काही लोक महिनाभर पण जातात.

तिथला आवडलेला खाद्यपदार्थ…दोघंही आम्ही खाण्याचे शौकीन आहोत. आम्हाला दोघांनाही तिथला स्टेक डिनर आवडला होता.

ठिकाणाचे वर्णन...जगाच्या वर्णनापलिकडे.

अनोळखी ठिकाण की रोमॅन्टिजम…अनोळखी ठिकाण आणि रोमॅण्टिकपणा दोन्ही महत्वाचा. रोमॅण्टिक होण्यासाठी माझ्यामते ठिकाणाची गरज लागत नाही. पण अनोळखी ठिकाण असेल तर सोनेपे सुहागा..

जोडीदाराची खास आठवण?…आठवणी या खास लक्षात राहण्यासारख्या असतात. आपल्या आयुष्यातल्या पहिल्या आठवणी या कायम लक्षात राहतात.. जेव्हा आम्ही एकमेकांना डेट करत होतो ते पहिले वर्ष होते त्यातल्या आठवणी या खास होत्या.

एकमेकांसाठी घेतलेली भेटवस्तू...वस्तूंमध्ये आम्ही फारसे रमत नाही एकमेकांसोबत जास्त रमतो.

मधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार...उर्मिलामध्ये अजिबात काही फरक झाला नाही. जशी ती आधी होती तशीच ती आता आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांना जास्त समजतो.