
बॉलिवूडची ‘स्टाईल आयकॉन’ अभिनेत्री सोनम कपूर आणि व्यावसायिक आनंद आहुजा दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. 29 मार्च 2026 रोजी सोनमने एका गोंडस मुलाला जन्म दिला. ही आनंदाची बातमी सोनमने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करून चाहत्यांसोबत शेअर केली. “आमच्या कुटुंबात एका नवीन सदस्याचे आगमन झाले असून आमचे मन आनंदाने भरून आले आहे, असे म्हणत आपल्या पोस्टमधून तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. काही महिन्यांपूर्वीच सोनमने दुसऱ्यांदा आई होणार असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती.
View this post on Instagram
सोनमने पुढे लिहिले की, त्यांचा मोठा मुलगा ‘वायू’ आपल्या लहान भावाचे स्वागत करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. नवीन बाळामुळे त्यांच्या घरात आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून हे त्यांच्या आयुष्यातील एक सुंदर वळण असल्याचे तिने नमूद केले. सोनमच्या या घोषणेनंतर करीना कपूर, रिया कपूर, हुमा कुरेशी आणि दिया मिर्झा यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर कमेंट्स करत या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांचा विवाह 2018 मध्ये झाला होता. त्यानंतर 2022 मध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचा वायूचा जन्म झाला. गेल्या वर्षी नोव्हेंबर 2025 मध्ये सोनमने एका खास फोटोशूटद्वारे आपल्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची बातमी दिली होती. आता दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर कपूर आणि आहुजा कुटुंबात उत्सवाचे वातावरण असून चाहतेही या चिमुल्या पाहुण्याची पहिली झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
Photo – सोनम कपूरने काळ्या रंगाच्या साडीत फ्लॉन्ट केले बेबी बम्प, फोटो होत आहेत व्हायरल




























































